कार-बाइकवरही सोने
सोन्याचे दागिने घालण्याचा छंद असलेला एक व्यक्ती हे दागिने किलोच्या हिशेबाने घालत आहे. गोल्ड प्लेटेड कार आणि बाइक देखील त्याच्याकडे आहे. व्हिएतनामचा रहिवासी ट्रान डुक लोई अलिकडेच स्वतःच्या सोन्याबद्दल प्रेमामुळे व्हायरल झाला आहे. फेंग सुईला आपण मानतो, याचमुळे हे सोन्याचे दागिने घालतोय असे त्याचे म्हणणे आहे. टिकटॉकवर त्याच्या अनेक चित्रफिती मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय आहेत.
ट्रान व्हिएतनामच्या अन गियांग प्रांतात राहतो. ट्रानला व्हिएतनाममध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. गळय़ापासून हातांपर्यंत तो सोन्याचे दागिने घालून असतो. जेव्हा तो घराबाहेर पडतो, तेव्हा तो लोकांचे लक्ष वेधून घेण्यास यशस्वी ठरतो. ट्रान दक्षिण अमेरिकन सरडा आणि अन्य मूल्यवान प्राणी स्वतःच्या देशात विकण्याचे काम करतो. सोन्याचे दागिने परिधान करणे माझ्या व्यवसायासाठी भाग्यशाली ठरल्याचे त्याचे मानणे आहे. घराबाहेर पडल्यावर अधिकाधिक सुवर्णालंकार घालण्याचा त्याचा प्रयत्न असतो.
ट्रान पूर्वी कमी दागिने घालत होता. परंतु हळूहळू त्याने दागिन्यांचे प्रमाण वाढविण्यास सुरुवात केली. दागिन्यांचे वजन वाढत गेले, परंतु आता त्याला याची सवय झाली आहे. तो टिकटॉकवर दागिन्यांसोब अनेक चित्रफिती शेअर करतो. त्याच्याकडे गोल्ड प्लेटेड कंवर्टिबल कार देखील आहे. तर एक बाइक देखील सोनेरी रंगाची आहे.
माझ्याकडे 2 किलोंहून अधिक वजनाचे दागिने आहेत. 250 ग्रॅमची चेन आहे. 10 सोन्याच्या अंगठय़ा आणि एक मोठे ब्रेसलेट आहे. तसेच एक मोठे गोल्ड प्लेटेड घडय़ाळ असल्याचे त्याने म्हटले आहे.