जगातील पहिल्या टेक्स्ट मेसेजचा लिलाव होणार आहे. व्होडाफोनच्या एका कर्मचाऱयाने सर्वात पहिला मेसेज 1992 मध्ये पाठविला होता. त्याने स्वतःच्या सहकाऱयाला हा मेसेज पाठविला होता, त्यात नाताळाच्या शुभेच्छा असे लिहिण्यात आले होते. आता या मेसेजचा लिलाव 1 लाख 70 हजार युरोंमध्ये (सुमारे 1 कोटी 71 लाख रुपये) होऊ शकतो.
ब्रिटिश प्रोग्रामवर नील पापवोर्थ यांनी 29 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1992 रोजी जगातील पहिला मेसेज पाठविला होता. आता दूरसंचार कंपनी व्होडाफोन या मेसेजचा लिलाव करणार आहे. या एसएमएसच्या डिजिटल प्रतीचा लिलाव पॅरिसमध्ये केला जाणार आहे. एगट्स ऑक्शन हाउसमध्ये 21 डिसेंबरपर्यंत लिलाव होईल.
दूरसंचार कंपनी व्होडाफोनमध्ये नील पापवोर्थ एक डेव्हलपर आणि टेस्ट इंजिनियर होते. यादरम्यान त्यांनी या एसएमसएसला संगणकाद्वारे स्वतःचा सहकारी रिचर्ड जारविस यांना पाठविला होता. 1992 मध्ये रिचर्ड हे कंपनीचे संचालक होते. पापवोर्थ यांनी रिचर्डला हा एसएमएस ऑर्बिटल 901 हँडसेटवर पाठविला होता.
जेव्हा हा एसएमएस पाठविला तेव्हा तो इतका प्रसिद्ध होईल असा विचारही केला नव्हता असे नील यांनी म्हटले आहे. व्होडाफोनने लिलावातून मिळणाऱया रकमेचे काय करणार याची माहिती दिली आहे. लिलावातून प्राप्त रक्कम युएनएचसीआर-युएन रिफ्यूजी एजेन्सीला देण्यात येणार आहे. 1995 पर्यंत केवळ 0.4 टक्के लोकच एसएमएसचा वापर करत होते.