ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश दोन कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य बनले आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी आज दिली.
ते म्हणाले, शुक्रवारी प्रदेशात 1,66,398 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. तर प्रदेशात आता पर्यंत 2 कोटी 10 लाख 28 हजार 312 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत 5,22,866 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.5% इतके आहे. तर आता पर्यंत कोरोनामुळे 7 हजार 900 जणांनी आपला जीव गमावला आहे.