वृत्तसंस्था / बिजापूर
छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्हय़ात जिल्हा राखीव दल आणि सीआरपीएफने रविवारी एका चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जाबेली गावानजीक जंगलात पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास चकमक झाली आहे. जवान गस्त घालत असताना सशस्त्र नक्षलवाद्यांच्या समुहाने त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. चकमक थांबल्यावर घटनास्थळावरून दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह, एक बंदूक, पिस्तुल, स्फोटक सामग्री आणि नक्षलवादाशी निगडित सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. संबंधित भागात अतिरिक्त तुकडी पाठवून शोधमोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे.