वितरणातून नोटेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या 2 हजार रुपायांच्या नोटेचे भविष्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. तसेच बँकांकडून आपल्या ऑटोमेटेड टेलर मशीनमध्ये (एटीएम) बदल केले असून या मशीनमध्ये दोन हजारच्या नोटेच्या ठिकाणी 500 रुपयाची नोट ठेवण्यासाठीचा प्रयत्न सुरु आहे.
परंतु यामुळे पुन्हा एकदा दोन हजारची नोट बंद होणार का यावर मोठी चर्चा सुरु असल्याची माहिती बिजनेस स्टॅण्डर्डमधील सुत्रांकडून देण्यात आली आहे. देशभरात 2.40 लाख एटीएम मशीनमध्ये मोठय़ा प्रमाणात रीकॅलिबेट करुन त्यामध्ये दोन हजारच्या नोटांच्या जागी कमी करुन त्या ठिकाणी 500 रुपयाच्या नोटा ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे.
काय होणार बदल
सर्वसाधारण एटीएममध्ये चार विभाग असतात. त्यात 2000, 500, 200 आणि 100 रुपयांची नोट ठेवली जाते. परंतु आता नवीन व्यवस्थेनुसार पहिल्या तीन विभागात 500 रुपयांची नोट ठेवण्यात येणार आहे. आणि चौथ्या विभागात 200 आणि 100 रुपये ठेवण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार एटीएममधील 2000 हजार रुपये ठेवण्यात येणारा विभाग काढून टाकण्यात आला आहे आणि एक वर्षापर्यंत सर्व एटीएममधून तो कमी करण्याची शक्यता आहे. सध्या 2000 हजारची नोट येत आहेत. त्या बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये ठेवली जात आहे, यामुळे ही नोट रिझर्व्ह बँकेच्या वॉल्टमध्ये परत पाठविले जाण्याचा अंदाज आहे.
न घाबरण्याचा सल्ला
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कायदेशीरपणे दोन हजारची नोट बंद केली जाणार नाही. परंतु त्या नोटेला वितरणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे म्हटले आहे. यासोबतच एटीएमचे कॅसेटमध्ये (कप्प्यात) हळू-हळू बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांनी न घाबरण्याचाही सल्ला यावेळी देण्यात आला आहे. यावर इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना बँकेच्या एटीएममधून दोन हजारची नोट येत्या 1 मार्चपासून काढता येणार नसल्याची सूचना दिली आहे.