आता प्रतीक्षा तपासणी अहवालांची, सोमवारी जिल्हय़ात कोरोनाचे13 नवे रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
दोन दिवसांत बेळगाव शहर व तालुक्मयातील 2 हजार 247 विद्यार्थ्यांचे स्वॅब जमविण्यात आले आहेत. तपासणीसाठी ते लॅबला पाठविण्यात आले आहे. प्रशासनाला अहवालांची प्रतीक्षा आहे. सोमवारी बेळगाव जिल्हय़ात 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
एकूण बाधितांची संख्या 25 हजार 473 वर पोहोचली असून सोमवारी बेळगाव येथील एका बाधिताचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांचा सरकारी आकडा 341 वर पोहोचला आहे. सोमवारी समर्थनगर, आंबेवाडी, भाग्यनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बेळगाव शहर व उपनगरांतील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी आरोग्य विभागातील पथकांनी वेगवेगळय़ा कॉलेजच्या 1107 विद्यार्थ्यांची स्वॅब तपासणी केली आहे. शनिवारी 1140 जणांची तपासणी झाली होती. दोन दिवस जमविलेले 2 हजार 247 स्वॅब लॅबला पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारी 800 हून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वॅब तपासणीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 2 लाख 67 हजार 743 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यामध्ये 2 लाख 38 हजार 756 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या 319 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 2 हजार 6 हून अधिक जणांचे अहवाल यायचे आहेत.
आणखी एक प्राध्यापक पॉझिटिव्ह
सोमवारी आणखी एका प्राध्यापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 8 प्राध्यापकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सोमवारी 600 स्वॅब तपासणी अहवाल उपलब्ध झाले आहेत. यापैकी एका प्राध्यापकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. प्राध्यापक व कर्मचाऱयांचे स्वॅब तपासणी अहवाल अद्याप यायचे आहेत.