विनातिकीट करत होता प्रवास, कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / काणकोण
मुंबई ते मेंगलोर मार्गावर कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱया राजस्थानच्या एका व्यक्तीकडून कारवारच्या कोकण रेल्वे पोलिसांनी 2 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. संशयास्पदरीत्या बॅग घेऊन जाणाऱया सदर इसमाला पोलिसांनी बॅग उघडण्यास सांगितल्यानंतर सदर इसमाने नकार दिला. मात्र पोलिसांनी ज्यावेळी बॅग उघडली त्यावेळी त्यात ही मोठी रक्कम आढळली. ही रक्कम आपण मेंगलोर येथील एका व्यक्तीला देण्यासाठी मुंबईहून आलो असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. मात्र रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून संशयिताला अटक करून त्याला व जप्त केलेल्या पैशांच्या बॅगेला कारवार पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, अशी माहिती कारवारचे कोकण रेल्वे पोलीस निरीक्षक विपील सिंह राणा यांनी दिली.