Tarun Bharat

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज 2 तासांचा ब्लॉक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज 12 ते 2 या वेळत किवळे ते सोमाटणे फाटय़ादरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आलं आहे.

आयटीएमएस प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हर हेड ग्रँटी बसवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर हा ब्लॉक घेण्यात आला आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम केलं जाणार आहे. त्यासाठी आज दुपारी 12 ते 2 या 2 तासांमध्ये किवळे ते सोमाटणे मार्गावरुन वाहनधारकांना जाता येणार नाही. दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?, विधानसभेतील राड्यावरून राज ठाकरेंचा संताप

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 48 वरून तसंच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे.

Related Stories

सातारा जिल्ह्यात ६९ पॉझिटिव्ह तर सहा जणांचा मृत्यू

Archana Banage

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात दाखल

Archana Banage

बार्शीतील गर्दी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार : बार्शीचे आमदार राऊत यांची माहिती

Archana Banage

चौदाव्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

datta jadhav

मुलीचा मृत्यू: आई-वडिलांनी संपवले जीवन

Abhijeet Khandekar

काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडीसोबत – बाळासाहेब थोरात

Archana Banage