Tarun Bharat

दोन भारतीय मच्छीमार नौकेवरील १६ खलाशी पाकिस्तानच्या ताब्यात, ७ जण पालघरमधील

ऑनलाईन टीम/तरुण भारत

गुजरात मधील दोन बोटी पाकिस्तानने ताब्यात घेतल्या असून, त्या बोटींवरील एकूण १६ खलाशांना अटक केली आहे. त्यापैकी सात खलाशी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, पालघरमधील मच्छिमार संघटनेनं (Fishermen’s Association in Palghar) यासंदर्भात माहिती दिली आहे. या सर्वांना पाकिस्तान मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने (pakistan maritime security agency) ताब्यात घेतले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बोटीतील माणसांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालघरमधील(palghar) मच्छिमार संघटनेनं दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी गुजरात मधील ओखा आणि पोरबंदर या भागात जात असतात. जवळपास दहा ते बारा हजार मच्छीमार कामगार पालघर जिल्ह्यातून या भागात रोजगारासाठी जातात. याच भागातील दोन बोटी भरकटल्याने पाकिस्तान हद्दीत गेल्या. त्यामुळे या बोटींवरील एकूण १६ मच्छीमार खलाशी मजूर यांना पाकिस्तान सैनिकांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी ७ खलाशी पालघर जिल्ह्यातील असून. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील बोर्डी जवळील एका गावातील हे मच्छीमार खलाशी कामगार आहेत.

हे ही वाचा : बिहारचे कृषीमंत्री सुधाकर सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा

गुजरातमधील ओखा येथील मत्स्यगंधा आणि एक मच्छीमार बोट मासेमारीसाठी गेली होती. या बोटींवरील एकूण ७ खलाशी पालघर जिल्ह्यातील आहेत. पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीने या सर्व खलाशांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुद्धा सुरु आहेत. यासंदर्भातील माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फॉर्म फॉर पीस अॅन्ड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतिन देसाई यांनी दिली.

Related Stories

कात्रजमध्ये एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने?

datta jadhav

सोलापूर शहरात ८८, ग्रामीणमध्ये ३३ नव्या रुग्णांची भर

Archana Banage

तालिबानला पाकिस्तान पुरवतोय रसद

Patil_p

500 वर्षे जुन्या जहाजाचे अवशेष हस्तगत

Patil_p

पेरूमध्ये 2 लाखांहून अधिक रुग्ण

Patil_p

भाजपचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही

datta jadhav
error: Content is protected !!