नवी दिल्ली
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सीमा शुल्क विभागाच्या पथकाने 2 किलो 200 ग्रॅम सोने जप्त केले आहे. या जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 2 कोटी 24 लाख रुपये इतकी आहे. एक भारतीय हे सोने बँकॉक येथून भारतात आणत होता. आरोपीला कस्टम अॅक्ट 1962 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. बिस्किटाच्या आकारात दोन टेट्रापॅकमध्ये आरोपीने हे सोने भारतात आणले असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाने दिली आहे.