Tarun Bharat

आथणी येथे गंभीर अपघात २ ठार ३९ जखमी

आथणी येथे मिरज – विजापूर रस्त्यावर अथणी शहराबाहेर ३ किलोमीटर अंतरावर गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात वाहनांचे दोन्ही चालक ठार झाले असून ३९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी हा अपघात घडला. बनजवाड हायस्कूल व कॉलेजच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आणण्यासाठी गेलेली बस व प्लास्टिक पाईपने भरलेला आयसियर टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली असून गंभीर अपघात घडला आहे. सदर बस मधून ७४ प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एका शिक्षकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर एका शिक्षकाचा हात व पाय तुटला आहे. आमदार श्रीमंत पाटील यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून मदतीचा हात दिला आहे. जखमींना आथणी शहरातील खाजगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

बाधितांच्या नातेवाईकांना सिव्हिलमध्ये प्रवेशबंदी

Amit Kulkarni

मनपा कर्मचारी मालमत्तांच्या सर्वेक्षणात व्यग्र

Amit Kulkarni

अभंगरंगमध्ये स्वरांच्या सरींनी रसिक तृप्त

Amit Kulkarni

खबरदारी म्हणून विजयनगर येथील तरुणाला अटक

Patil_p

सापडलेले मंगळसूत्र केले परत

Patil_p

खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Amit Kulkarni