नोकरी मिळण्याच्या आशेने अनोळखी फोन-पे वर पाठवले पैसे ; वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
शेंदुरजणे (ता. वाई) येथील प्रगती बाळासाहेब जगताप (वय 24) हिला अनोळखी मोबाईलवरुन फोन आला. तुम्हाला जावा डेव्हपलच्या पोस्टसाठी सिलेक्ट केले आहे. तुम्ही पैसे भरा, त्यावरुन त्या युवतीने मित्र, मैत्रिण, नातेवाईक यांच्या फोन-पे वरुन 2 लाख 20 हजार रुपये भरले. पैसे भरल्यानंतर प्रगती जगताप हिला समजले की आपली फसवणूक झाली आहे. त्यावरुन तिने वाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रगती जगताप हिने दिलेल्या फिर्यादीवरुन ती शेंदूरजणे येथील रहिवाशी आहे. तिच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन फोन आला. समोरील व्यक्तीने आम्ही नोकरी डॉट कॉममधून बोलत आहोत. तुम्हाला जावा डेव्हलेपर या पोस्टसाठी सिलेक्ट केले आहे. तुम्ही 2 लाख 20 हजार रुपये भरा, अशी विनंती केली. त्यावरुन प्रगती जगताप हिने नातेवाईक, मैत्रिणीच्या मोबाईलवरुन त्या अनोळखी व्यक्तीच्या फोन-पे नंबरवर तब्बल 2 लाख 20 हजार रुपये दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता पाठवले. त्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले. तिने वाई पोलीस ठाण्यात दि. 10 रोजी फिर्याद दाखल केली असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाळूंज हे करत आहेत.