प्रत्येक महिन्याला 2 टक्केप्रमाणे दंडाचा भुर्दंड : 55 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी /बेळगाव
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे एप्रिल महिन्यात 21 कोटी 41 लाखांहून अधिक घरपट्टी जमा झाली होती. आतापर्यंत 28 कोटी घरपट्टी जमा झाली आहे. 30 जूनपर्यंत विनादंड घरपट्टी भरता येणार आहे. मात्र 1 जुलैपासून प्रतिमहिना 2 टक्के दंडाचा भुर्दंड भरावा लागणार आहे.
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के कर सवलत देण्यात येते. मागीलवषी महापालिकेने 86 टक्के घरपट्टी वसूल केली होती. 2022-23 या आर्थिक वर्षात 55 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी केवळ एप्रिल महिन्यात 21 कोटी 41 लाख 94 हजार 676 घरपट्टी जमा झाली आहे. महापालिका व्याप्तीत 1 लाख 41 हजार 175 मालमत्ता आहेत. यापैकी 39 हजार 702 मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरून सवलतीचा लाभ घेतला होता. एप्रिलपासून आतापर्यंत केवळ अडीच महिन्यांत 28 कोटी घरपट्टी महापालिकेच्या खजिन्यात जमा झाली आहे. त्यामुळे आगामी 9 महिन्यांच्या कालावधीत उर्वरित 27 कोटी घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. एप्रिल महिन्यात 5 टक्के सवलत देण्यात येते. मे-जून महिन्यात केवळ घरपट्टी जमा करून घेतली जाते. मात्र जुलैपासून प्रतिमहिना 2 टक्के दंडाची आकारणी थकीत घरपट्टीवर केली जाते. विनादंड व्याज भरण्यासाठी मालमत्ताधारकांकडे केवळ 12 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. जुलैपासून प्रतिमहिना 2 टक्के दंड आकारणी केली जाणार आहे.