Tarun Bharat

काश्मीरमध्ये चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

बारामुल्ला-शोपियानमध्ये सुरक्षा दलाचा संघर्ष

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे गुरुवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागात अनेक दहशतवादी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली. येडीपोरा-पट्टण भागात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. याशिवाय शोपियानच्या चित्रगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्येही शुक्रवारी चकमक झाली. दोन्ही ठिकाणी झालेल्या संघर्षात दोघांचा खात्मा करण्यात आला असून सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. अन्य संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी अतिरिक्त फौजफाटा मागवत व्यापक मोहीम हाती घेतली होती. दहशतवादी या परिसरात लपून बसल्याचा संशय आहे. येथील रहिवासी भागात लपलेले दहशतवादी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र, तरीही सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. दोन्ही भागात तीन ते चार दहशतवादी असल्याची शक्मयता व्यक्त केली जात होती. शोपियानमध्ये गोळीबार थांबला असला तरी बारामुल्लामध्ये रात्रीपर्यंत दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू होती. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सुरक्षा दल प्रयत्न करत होते. स्थानिक मौलवींच्या मदतीने दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते.

Related Stories

वाराणसीमध्ये आणखी 18 नवे कोरोना रुग्ण

Omkar B

आयटीबीपीच्या श्वानपथकात 16 नवे सदस्य

Omkar B

चीनमधील भारतीय प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम रद्द

prashant_c

तिरूपती बालजी मंदिर उद्यापासून होणार खुले

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

datta jadhav

डिजिटल मतदार ओळखपत्र आजपासून मिळणार

Patil_p
error: Content is protected !!