Tarun Bharat

कळंगुटमधील 20 डान्सबार बंद, पंचायतीकडून कारणे दाखवा जारी

प्रतिनिधी /म्हापसा

कळंगूट पंचायतीने धडक मोहीम राबविल्याने अवैधरित्या डान्सबार चालकांनी स्वतःहूनच डान्सबार बंद केले आहेत. हे बेकायदा डान्सबार  बारचा परवाना घेऊन चालविले जात होते. या सर्व डान्सबारना पंचायतीने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समुद्रकिनारी भागात ध्वनिप्रदूषणाविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर कळंगूट पंचायतीने बेकायदा डान्सबारविरोधात सोमवारपासून कडक पावले उचलली आहेत.

दोन दिवसांपूर्वी कळंगूट समुद्रकिनारी एका पंच सदस्यांच्या मुलासह दोघांना मारहाण झाली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंचायतीने डान्सबार विरोधात मोहीम सुरू केली होती. सोमवारी रात्री सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली पंचायतीने डान्सबारची तपासणी केली. या तपासणी मोहिमेत काही आजी-माजी पंचायत सदस्यांचा समावेश होता. सुरुवातीला त्यांनी ‘श्री किंग्ज’ प्रीमियम क्लब व डेविल क्लब हे डान्सबार बंद करण्यास चालकांना भाग पाडले. यामुळे इतर डान्सबार चालकांनी स्वतःहून आपली आस्थापने तत्काळ बंद केली. मंगळवारी सकाळी पंचायतीने या सर्व डान्सबार चालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या कारवाईत पोलिसांना ग्रामस्थांचे चांगल्यापैकी सहकार्य मिळत असल्याचे सरपंचांनी सांगितले.

गावात अवैधपणे चालणाऱया डान्सबारवर आम्ही मोहीम राबवून कारवाई केली आहे. आम्हाला हे पर्यटनक्षेत्र डान्सबारमुक्त करायचे आहे. गत पंचायत मंडळाच्या कार्यकाळात या डान्सबारना उधाण आले होते. तत्कालिन पंचायत मंडळाच्या वरदहस्तामुळेच हा बेकायदा व्यवसाय फोफावला आहे असा आरोप यावेळी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून डान्सबार व मसाज पार्लरच्या नावे चालणाऱया गैरकृत्यांमुळे कळंगुटचे नाव बदनाम होत आहे. टाऊड्स (दलाल) लोक देशी पर्यटकांना सर्वकाही पुरवण्याचे आमिष दाखवून व नंतर त्यांना डान्सबार तसेच मसाज पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारझोड करून लुबाडत होते. हे प्रकार कळंगुटमध्ये सर्रासपणे घडत होते. शिवाय या डान्सबारच्या नावाखाली सदर ठिकाणी इतर अवैध धंदे चालविले जात होते. पण पंचायतीची ही कारवाई राजकीय प्रेरित असून या कारवाईद्वारे गावात राजकारण खेळले जात असल्याचा आरोप स्थानिकांतून केला जात आहे.

पंचायती व अबकारी खात्याकडून फक्त बार व रेस्टॉरन्टसाठी व्यवसाय परवाना घेतला जातो. पण, प्रत्यक्षात डान्सबार न नाईट कल्ब चालवले जातात. हे प्रकार किनारपट्टीत सर्रासपणे सुरू आहेत. राज्यात डान्सबार किंवा नाईट क्लब ही व्यवसायाची संकल्पना नसल्याने असे प्रकार केले जात आहेत.

रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अवैध डान्सबार तसेच नाईट क्लब चालवले जातात. त्यासाठी मद्यविक्रीचा खास परवाना घेतला जातो. शिवाय अतिरिक्त परवान्यासाठी दर दिवशी 3 लाख रुपये शुल्क अबकारी खाते आकारते. बार परवान्यासाठी वार्षिक 12 ते 15 हजार रुपये शुल्क घेतले जाते. शिवाय हंगामी बार परवान्यासाठी नऊ महिन्यांसाठी 25 ते 50 हजार रुपये शुल्क आकारले जाते.

Related Stories

मडगावात शनिवारी सरकार विरोधात जाहीर सभा

Omkar B

सॅफ फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात पाच गोमंतकीय फुटबॉलपटू

Amit Kulkarni

म्हापसा सार्वजनिक गणेशोत्सव देणगी कुपन विक्री शुभारंभ

Amit Kulkarni

राज्यातील खाणी लवकरच सुरु करणार

Patil_p

जिल्हाधिकाऱयांच्या निर्देशानुसार करंजाळे येथे मासेविक्रीला सुरूवात

Patil_p

आपचे मैदानात,अन्य आमदार, लोकप्रतिनिधी गायब

Amit Kulkarni