Tarun Bharat

टँकर-बस धडकेनंतर पाकिस्तानात 20 ठार

Advertisements

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

पाकिस्तानातील मुलतानमध्ये मंगळवारी प्रवासी बस आणि इंधन टँकरची धडक बसून मोठा अपघात घडला. बस-टँकरच्या धडकेनंतर लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच बसमधील अन्य प्रवासी होरपळून जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. परिणामी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वैद्यकीय अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे. जखमींना मुलतानच्या निश्तर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव आणि अग्निशमन दलाला बचावकार्यात मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला.

लाहोरपासून 350 किमी अंतरावर असलेले मुलतान हे पंजाब प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे. येथे मंगळवारी भीषण रस्ते अपघात घडला. पावसानंतर निसरडय़ा झालेल्या मार्गावर प्रवासी बस आणि इंधनचा टँकर यांची धडक बसली. बसचा वेग खूपच जास्त असल्यामुळे हा अपघात झाला. धडक बसल्यानंतर बस आणि टँकर दोघांनाही आग लागल्यामुळे बसमधील प्रवासी होरपळले. दुर्घटनेनंतर मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते. डीएनए चाचणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन सोपवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

Related Stories

देशाचे वैभव वाढविणे, हेच ‘आत्मनिर्भर’तेचे उद्दिष्टय़

Amit Kulkarni

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Patil_p

म्यानमारमध्ये सत्तापालटाच्या विरोधात तीव्र निदर्शने

Patil_p

‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी हरियाणा सरकारने पाठविल्या 31 बस

prashant_c

लखीमपूर खेरी साक्षीदारांना संरक्षण द्या !

Patil_p

कमलनाथ सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीत रवाना

Rohan_P
error: Content is protected !!