Tarun Bharat

KYC च्या नावाखाली निवृत्त महिला प्राध्यापकास 20 लाखांचा गंडा

पुणे / प्रतिनिधी :

पुणे शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयातील एका निवृत्त महिला प्राध्यापकाला सायबर चोरट्यांनी ‘केवायसी अपडेट’च्या नावाखाली 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. तक्रार मिळताच अलंकार पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत 20 लाखांतील 13 लाख रुपये बँकेच्या खात्यात गोठवले (सिझ) असल्याची माहिती शनिवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 74 वर्षांच्या असून त्या पुण्यातील कोथरुड येथील करिष्मा सोसायटीत राहतात. त्यांना सायबर क्राइमबद्दल ज्ञान आहे. यामुळे त्या नेहमी सजगतेने व्यवहार करतात. तसेच इतरांनाही मार्गदर्शन करतात. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता, त्यांना मोबाइलवर एका व्यक्तीचा फोन आला. त्याने ‘केवायसी अपडेट’ ऑनलाइन करावे लागेल, असे सांगितले. यानंतर त्यांच्याकडून बँकेची व ‘केवायसी’साठी लागणारी कागदपत्रे ऑनलाइन मागून घेतली. दरम्यान, चोरट्याने रात्रीच 40 ट्रान्स्जॅक्शन करून त्यांच्या बँक खात्यातून 20 लाख रुपये काढून घेतले. याचे मेसेज त्यांनी सकाळी उठल्यावर मोबाइलवर बघितले आणि अलंकार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने यंत्रणा कार्यरत करत पैसे गेलेल्या बँक खात्याची माहिती काढली. यातील एका बँक खात्यातील दहा लाख, तर दुसऱ्या बँक खात्यातील तीन लाख संबंधित बँकांशी बोलून तातडीने गोठवले. यामुळे सायबर चोरट्यास हे पैसे काढता आले नाहीत. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. सहाणे करत आहेत.

अधिक वाचा : फडणवीसांवर आक्षेपार्ह पोस्ट भोवली; तरुणावर गुन्हा

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आवाहन…

बँकेतून केवायसी अपडेटसाठी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीच फोन येत नाहीत. केवायसी अपडेट करायची असेल, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन काम करावे. ऑनलाईन केवायसी अपडेट करताना सायबर चोरट्यांकडून आर्थिक फटका बसू शकतो, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

कामगार दिनी टोल कर्मचारी पगारासाठी संपावर

Patil_p

पेगासस प्रकरण: सुप्रीम कोर्टाने चौकशी समितीचा कार्यकाळ वाढवला

Archana Banage

किरीट सोमय्यांचा पवार काका-पुतण्यावर हल्लाबोल

Archana Banage

‘तुमचा मुसेवाला करून टाकू’; सलमान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

Archana Banage

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खासदार धैर्यशील माने साधणार संवाद

Archana Banage

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गोळीबार; एकजण जखमी

datta jadhav