Tarun Bharat

एलआयसीच्या उत्पन्नात 20 टक्के वाढ

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसीने जून 2022 अखेरच्या तिमाहीत उत्पन्नाची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. या सदरच्या तिमाहीत एलआयसीचे प्रिमियमच्या माध्यमातून एकूण उत्पन्न 20 टक्के इतके वाढले असल्याची बाब समोर आली आहे.

एलआयसीने एप्रिल ते जून 2022 या कालावधीत प्रिमियम उत्पन्नाच्या माध्यमातून 98 हजार 352 कोटी रुपये कमावले आहेत. याआधी जून 2021 च्या तिमाहीत हेच उत्पन्न 81 हजार 721 कोटी रुपये इतके होते. तर 30 जून 2022 अखेरच्या कालावधीत करपश्चात नफा 682.88 कोटी रुपयांवर पोहचला आहे. एकंदर सर्व व्यवसाय सुरळीत सुरू झाल्याने विपणन कार्यप्रणाली वेग घेताना दिसली. बाजारात पहिल्या वर्षाच्या प्रिमियम उत्पन्नात एलआयसीने 65 टक्के वाढ नोंदवली आहे. वार्षिक एकुण प्रिमियम 10 हजार 270 कोटींचे मिळवले आहे. यात वैयक्तिक व्यवसायातून 6 हजार 450 कोटी तर समूह व्यवसायातून 3 हजार 819 कोटी प्राप्त झाले आहेत. जूनअखेरच्या तिमाहीत 36.81 लाख पॉलिसीज विकल्या गेल्या असून मागच्या तिमाहीपेक्षा 59 टक्के अधिक पॉलिसीज विक्री झाल्या आहेत.

बंद पॉलिसी सुरु करण्यासाठी विशेष मोहीम

सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) यांनी बंद (लॅप्स) झालेल्या व्यक्तिगत विमा पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी एक विशेष मोहीम सुरु करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. एलआयसीने सादर केलेल्या माहितीमध्ये युलिपला(युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन)वगळता सर्व पॉलिसींना विशेष मोहीमेंतर्गत विलंब शुल्कात सवलतीसह पुन्हा या पॉलिसी सुरु करता येऊ शकणार आहेत. ही मोहीम 17 ऑगस्टपासून सुरु  असून 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती आहे. ज्यांना काही कारणास्तव प्रीमियम भरता आलेला नाही किंवा ज्यांची पॉलिसी बंद झाली आहे अशांसाठी ही मोहीम असणार आहे.

Related Stories

लिस्टेड कंपन्यांचे 20 वर्षांतील बाजारमूल्य वाढले

Omkar B

4,32,796 निष्क्रिय कंपन्यांची नावे नोंदणीकृत सुचीमधून हटवली

Patil_p

ऑइल इंडियाच्या समभागाचा विक्रम

Amit Kulkarni

ऍमवेची 100 कोटींची गुंतवणूक

Patil_p

आयसीआयसीआय लोम्बार्ड-प्लमची नवीन समूह आरोग्य विमा योजना

Omkar B

स्पाइसजेट 50 विमाने खरेदी करणार

Patil_p
error: Content is protected !!