प्रतिनिधी/बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. सीमाप्रश्नावरून कर्नाटक सरकार आक्रमक झाले होते. बेळगावमधील मराठी भाषिकांचा महामेळावा होऊ दिला नाही. त्यावर आता शिंदे- फडणवीस सरकारने सीमाप्रश्नी विधानभवनात ठराव मांडला.
सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाकडून सवलती पुरविण्यात येतील, तरुणांना नोकरीत प्राधान्य दिले जाईल, हुतात्म्यांच्या कुटुंबियांना दरमहा २० हजार रुपये भत्ता, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभाग, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नागरिकांना मदत याप्रमाणे इतर सुविधाही सीमावासीयांना महाराष्ट्र शासनाकडून पुरविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे.