Tarun Bharat

व्हिसा, वर्क परमीट मिळवून देण्याच्या आमिषाने 20 ते 25 जणांची फसवणूक

पुणे / वार्ताहर :

परदेशातील कंपनीकडून व्हिसा आणि वर्क परमीट मिळवून देण्याच्या आमिषाने 20 ते 25 जणांची बनावट कागदपत्रे देऊन 30 ते 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिना अहमद शेख (वय 27, रा. मार्केटयार्ड, पुणे), शितल चंद्रशेखर आर्ते (39, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि टोया इमिग्रेशन सर्व्हिसेसचे भागीदार, धानोरी, पुणे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेनू रवी चढ्ढा (वय-53, कल्याणीनगर, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा : सीमाप्रश्न मार्गी लावण्यासाठी पवारांनी काय केले?; राणेंचा सवाल

संबंधित प्रकार 26 मार्च 2019 ते 26 मे 2021 यादरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चढ्ढा यांच्या आर. के. ग्लोबल व्हिसा प्रा. लि. सेल्स या कंपनीत काम करणाऱ्या आरोपींनी टोयो इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या भागीदाराशी संगनमत केले. तक्रारदार चढ्ढा यांच्या कंपनीत काम करताना त्यांनी 20 ते 25 ग्राहकांना व्हिसा व वर्क परमीट मिळवून देत असल्याचे भासवून त्यांना टोयो इमिग्रेशेन सर्व्हिसेस या कंपनीत पैसे भरण्यास लावले. त्याबाबत ग्राहकांना कॉम्प्युटरद्वारे बनावट ऍग्रीमेन्ट बनवून देऊन ग्राहकांची 30 ते 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

Related Stories

पत्राचाळ घोटाळा प्रकरण: संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल

Archana Banage

पुणे : 11 जानेवारीपासून पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हल

Tousif Mujawar

पी. व्ही. सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओला नमवत जिंकले कांस्य पदक

Archana Banage

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैशांचे वाटप ; अंबादास दानवेंचा खळबळजनक आरोप

Archana Banage

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ‘कोरोना नाकाबंदी’

Archana Banage

कोल्हापूर : पेट्रोल टाकून युवतीला पेटवण्याचा प्रयत्न

Archana Banage