Tarun Bharat

200, 500, 2000 रुपयांच्या नोटांनी सजावट

Advertisements

एकूण 5.16 कोटी रुपयांच्या नोटांचा वापर

आंध्रप्रदेशच्या नेल्लोर येथील कन्याका परमेश्वरी मंदिराला नवरात्रोत्सवानिमित्त 5 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या नोटांनी सजविण्यात आले आहे. या मंदिरात वर्षात विविध तिथीनिमित्त विविध रुपांमध्ये देवीची पूजा करण्यात येते. नवरात्र-दसरोत्सवादरम्यान देवीला धनलक्ष्मीच्या रुपात पूजले जाते.

100 हून अधिक स्वयंसेवकांनी 5 कोटी 16 लाख रुपयांच्या एकूण मूल्याच्या चलनी नोटांसोबत मंदिर सजविण्यासाठी दीर्घकाळ काम केले आहे. सजावटीसाठी 2000 रुपये, 500 रुपये, 200 रुपये, 100 रुपये, 50 रुपये आणि 10 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.

4 वर्षांपूर्वी देखील 11 कोटी रुपयांच्या खर्चातून कन्याका परमेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तेव्हापासून नवरात्रोत्सव दरवर्षी भव्य स्वरुपात साजरा करण्यात येतो. यंदा देखील सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होतोय.

7 किलोग्रॅम सोने आणि 60 किलोग्रॅम चांदी देवीच्या मूर्तीला सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येते अशी माहिती नेल्लोर शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष मुक्कला द्वारकानाथ यांनी सांगितले आहे.

मागील वर्षी या मंदिरात 1 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या नोटांनी सजावट करण्यात आली होती. मागील वेळी माळा आणि गुच्छ तयार करण्यासाठी विविध रंगांच्या नोटांचा वापर करण्यात आला होता. तर नेल्लोरमध्ये एवढी रक्कम फक्त पताकांसारखी वापरणे सामान्य बाब मानली जाते.

Related Stories

हिंदू संस्कृतीचे प्रतीक चैत्रांगाण

Omkar B

रक्षाबंधननिमित्त ‘आयआरसीटीसी’कडून महिलांसाठी ‘ही’ खास ऑफर

Rohan_P

वेटर ते इंजिनियर

Patil_p

शिवप्रेमींनी पारंपरिक अभिषेकाने साजरा केला शिवराज्याभिषेक सोहळा

Rohan_P

किडय़ांची अंडी देवतांचे भोजन

Amit Kulkarni

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; मुख्यमंत्र्यांनी केली तपासणी

Rohan_P
error: Content is protected !!