ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राष्ट्रपतीपदासाठी उद्या (ता.१८) जुलै रोजी मतदान होणार आहे. तर २१ रोजी मतमोजणी होणार असून देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे. एनडीए कडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)तर विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मुर्मू वुरुध्द सिन्हा अशी लढत पाहायला मिळणार आहे. मित्रपक्षांसह अन्य काही प्रादेशिक पक्षांनी मुर्मू यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड आहे. तर सिन्हा यांना विरोधकांचा पाठिंबा असला तरी मतांची जुळवाजुळव त्यांना विजयापर्यंत नेईल, अशी शक्यता कमी आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातून २०० आमदार मतदानं करणार असा निर्धार केला आहे. राष्ट्रपती निवडणूकीसाठी (Presidential Election 2022) द्रौपदी मुर्मूं यांना शिवसेनेन देखील पाठिंबा जाहीर केला आहे.
मतांची आकडेवारी
शिंदे गट, भाजप असे मिळून जवळपास १८५ मताचं गणित मुर्मू यांच्या पाठिशी आहे. आता अतिरिक्त १५ आमदारांच्या मताची बेगमी त्य़ांना करावी लागणार आहे. त्यामुळे काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची करडी नजर आहे. तर यातील १५ आमदार शिंदे फोडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. कारण विधानपरिषद निवडणूकीत काॅंग्रेसची ८ ते १० मतं फुटली होती. यातील जर ८ मतं मुर्मू यांना मिळाली तर बाकीची उरलेली ७ मतं मिळवण्यासाठी भाजपा कोणती चालं खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक गुप्त पध्दतीने लढवली जाते यामध्ये व्हिप लागू होत नाही. त्यामुळे भाजपाचं पारड जड होण्याची शक्यता वर्तवली जातेयं. त्य़ातचं मुख्यमंत्री शिंदेंनी २०० आमदार मतदानं करणार असा निर्धार केला आहे. उद्या निवडणूक होणार आहे त्यामुळे आज भेटीगाटी होतात का? एका रात्रीत निर्णय बदलणार का हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा- शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती
काॅंग्रेसच्या बैठकांना सुरुवात
एकीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी २०० आमदार मतदानं करणार असा निर्धार केला तर दुसरीकडे आमदार फुटु नयेत खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून दोन दिवस काॅंग्रेसने बैठकीचं नियोजन केले आले आहे. राष्ट्रपती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसची खलबतं होतं आहे. विधानपरीषदेत मतं फुटली होती. याची खबरदारी म्हणून बैठक घेण्यात येत आहे. आज सध्याकाळी ६ वाजता आणि उद्या सकाळी ९ वाजता विधानपरिषद भवनात हि बैठक होणार आहे.