Tarun Bharat

2019-20 मध्ये बायजूसचा नफा दुप्पट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानांवर आधारीत स्टार्टअप म्हणून कार्यरत असणाऱया ‘बायजूस’चा नफा आर्थिक वर्ष 2019-20मध्ये दुप्पटपेक्षा अधिक होत 50.76 कोटी रुपयावर पोहोचला आहे. यामध्ये टॅबलेट, एसडीकार्ड आणि पुस्तकांच्या विक्रीचे विशेष योगदान असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

कंपनीचे आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये संचयाच्या आधारे उत्पन्न 82 टक्क्यांनी वधारुन 2,380.7 कोटी रुपये झाले असून जे 2018-19 मध्ये 1,306 कोटी रुपये होते. बायजूसचा तोटा आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये वधारुन 250 कोटी रुपये झाला आहे. जो 2018-19 मध्ये 9 कोटी रुपये होता.

मुख्य व्यवसायांची झेप

मजबूत व्यवसायांच्या मदतीने कंपनीने नफा कमाईत झेप घेतली असून दुसऱया बाजूला काही प्रमाणात नुकसानीचे चित्र राहिले असल्याचे बायजूसच्या मुख्य रणनीती अधिकारी अनीता किशोर यांनी नमूद केले आहे.

बायजूसचे निव्वळ उत्पन्न हे 2,110 कोटी रुपयावर राहिले असून यामध्ये
प्रमुख तीन व्यवसायांचा समावेश राहिला आहे. ते व्यवसाय पुढील प्रमाणे.

प्रमुख व्यवसाय                        उत्पन्न 

शैक्षणिक शुल्क ………………….. 144 कोटी रुपये

शैक्षणिक टॅब्टेल व एसडी कार्ड विक्री            1,675 कोटी रुपये

पुस्तकांची विक्री  560 कोटी रुपये

Related Stories

बोलविता धनी वेगळाच !

Patil_p

उत्तम व्यवस्थापक कोणास म्हणावे?

Patil_p

काँग्रेसला सूर सापडेल ?

Patil_p

गोवा मेगा जॉब फेअर… हातांना काम मिळो!

Patil_p

युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p

निमित्तास कारण की…..

Patil_p
error: Content is protected !!