Tarun Bharat

2020 मधील बॅलन डी ओर पुरस्कार रद्द

वृत्तसंस्था/ पॅरीस

आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱया फुटबॉलपटूला बॅलन डी ओर पुरस्कार दिला जातो पण यावेळी संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारी संकट सुरू असल्याने चालू वर्षांतील हा पुरस्कार दिला जाणार नाही, अशी माहिती आयोजक फ्रान्स फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.

1956 साली आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये बॅलन डी ओर पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला होता. ब्रिटनचा फुटबॉलपटू स्टॅनले मॅथ्यूजने हा पुरस्कार पहिल्यांदा मिळविला होता. कोरोना महामारी परिस्थितीमुळे विविध देशातील सर्व लीग फुटबॉल स्पर्धा गेल्या जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत रद्द करण्यात आल्या होत्या. प्रत्येक वर्षी जगातील सर्वोत्तम पुरूष फुटबॉलपटूला बॅलन डी ओर पुरस्कार देवून गौरविले जाते. गेल्या मे महिन्यात जर्मन बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेला बंदीस्त स्टेडियममध्ये फेर सुरूवात करण्यात आली होती. प्रेंच लीग-1 स्पर्धा कोरोनामुळे यापूर्वी रद्द करण्यात आली होती. गेल्यावर्षी अर्जेंटिनाच्या लायोनेल मेसीने विक्रमी सहाव्यांदा बॅलन डी ओर पुरस्कार मिळविला होता. 2018 साली पहिल्यांदा महिला फुटबॉलपटूसाठी बॅलन डी ओर पुरस्कार देण्यात आला. पण यावर्षी हा पुरस्कार रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णीचे निधन

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे जपानमध्ये आगमन

Amit Kulkarni

एनडीटीएलला पुन्हा वाडाची मान्यता

Patil_p

कर्नाटक, केरळ, उत्तराखंड विजयी

Patil_p

व्हेरेव्हची प्रशिक्षकाबरोबर फारकत

Patil_p

भारताचे पाच ऍथलेट्स कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!