Tarun Bharat

2020 मध्ये भारतीय प्रवाशांनी 6.10 कोटी मायदेशी पाठविले

Advertisements

बँक, पोस्ट कार्यालयासह अन्य ठिकाणाहून पाठविण्यात आलेल्या रक्कमेचा समावेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वर्ष 2020 मध्ये विदेशातील प्रवासी भारतीयांनी जवळपास 6.10 लाख कोटी रुपये (रेमिटेंस) आपल्या मायदेशी पाठविले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था ही कोरोनाच्या संकटामुळे प्रभावीत झालेली असतानाही ही कामगिरी सकारात्मक राहिल्याचे संकेत आहेत. 2019 च्या तुलनेत यामध्ये 0.2 टक्क्यांनी काहीशी घसरण राहिली आहे. 2019 मध्ये हाच आकडा 6.13 लाख कोटी रुपयावर राहिला असल्याची माहिती आहे.

जागतिक बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2020 मध्ये चीनला 4.37 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जे वर्ष 2019 मध्ये जवळपास 5 लाख कोटी रुपये प्राप्त झाले होते. 2020 मध्ये प्राप्त झालेल्या रक्कमेत भारत प्रथम आणि चीन दुसऱया स्थानी राहिल्याची नोंद केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार युनायटेड अरब अमीरातमधून भारताकडे येणाऱया रेमिटेंसमध्ये 2020 मध्ये 17 टक्क्यांनी घसरण आली आहे. भारत आणि चीन यांच्यापाठोपाठ रेमिटेंसच्या रुपात मेक्सिकोला 42.8 अब्ज डॉलर, फिलिपिन्सला 34.9 अब्ज डॉलर, पाकिस्तानला 26 अब्ज डॉलर, फ्रान्सला 24.4 अब्ज डॉलर आणि बांगलादेशाला 21 अब्ज डॉलरची रक्कम प्राप्त झाली आहे.

काय असते रेमिटेंस?

दुसऱया देशात काम करणाऱया प्रवाशांकडून बँक, पोस्ट कार्यालय किंवा ऑनलाईन ट्रान्स्फरच्या आधारे आपल्या मूळ देशात पाठविण्यात येणाऱया पैशाला किंवा रक्कमेला रेमिटेंस असे म्हटले जाते.

अमेरिकेतून पाठविली सर्वाधिक रक्कम

अमेरिकेतून सर्वाधिक रेमिटेंस पाठविण्यात आली आहे. यामध्ये वर्ष 2020 मध्ये अमेरिकेतून 68 अब्ज डॉलर रोख रक्कमेच्या स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. यानंतर अन्य देशांचा नंबर लागत असल्याची माहिती आहे.

Related Stories

ऍपलचे बाजार भांडवल 3 ट्रिलीयन डॉलर समीप

Amit Kulkarni

एलआयसी आयपीओ आतापर्यंत 1.19 पट सबस्क्राईब

Patil_p

25 वर्षात भारताचे दूध उत्पादन 62 कोटी टनवर पोहचणार

Patil_p

सेन्सेक्स 938 अंकांनी कोसळला

Patil_p

एलआयसीचे समभाग वधारले

Patil_p

जियोचे दर डिसेंबरपासून वाढणार

Patil_p
error: Content is protected !!