वृत्तसंस्था / टोकियो
2021 मध्ये मार्च महिन्यात घेतली जाणारी टोकियो मॅरेथॉन स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. जपानमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.
2020 सालात होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना समस्येमुळे एक वर्षासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर करण्यात आला. आता सदर स्पर्धा 2021 च्या जुलैमध्ये घेतली जाणार आहे. ऑलिम्पिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने आता टोकियो मॅरेथॉनच्या तारखेमध्येही फेरबदल करावा लागेल, असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
2021 सालातील टोकियो मॅरेथॉन स्पर्धा 7 मार्चला घेण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 38 हजार धावपटूंना सहभागाची परवानगी देण्यात आली होती. या मॅरेथॉनमध्ये इच्छुक धावपटूंच्या संख्येवर निर्बंध घातल्याने अनेक अव्वल स्पर्धक सहभागी होतील किंवा नाही याची खात्री देता येत नाही. आता सदर टोकियो मॅरेथॉन स्पर्धा 7 मार्च ऐवजी 17 ऑक्टोबरला घेण्याचा विचार चालू आहे. जागतिक स्तरावर 6 विविध विश्व मॅरेथॉन स्पर्धा प्रत्येक वषी घेतल्या जातात. यामध्ये बोस्टन, बर्लिन, शिकागो, न्यूयॉर्क आणि लंडन यांचा समावेश आहे. या विश्व मॅरेथॉनमधील बोस्टन, बर्लिन आणि शिकागो येथील 2020 सालातील मॅरेथॉन स्पर्धा कोरोनामुळे यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. तर गेल्या आठवडय़ात लंडन मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर टोकियो मॅरेथॉन स्पर्धा घेण्यासंदर्भात विचार चालू आहे.