नव्या गुंतवणूकदारांचा कंपनीला लाभ : आयपीओतून नवीन धोरण राबविणार
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑनलाईन फूड डिलिवरी कंपनी झोमॅटो सन 2021 पर्यंत आपला आयपीओ सादर करण्याची शक्मयता आहे, अशी माहिती कंपनीचे संस्थापक व कर्मचाऱयांनी ईमेलच्या आधारे दिली आहे. कंपनीमध्ये गुंतवणुकीसाठी टायगर ग्लोबल, टिमसेक, बॅली गिफोर्ड आणि आन्ट फायनान्शिअल यासारख्या मोठय़ा गुंतवणूकदारांच्या फंडिंगचा यामध्ये हिस्सा राहिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनीजवळ रक्कम वाढत जात 4.40 हजार कोटींच्या घरात पोहोचणार असल्याचे संकेत कंपनीचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी दिले आहेत.
झोमॅटो या स्टार्टअपमध्ये सर्वात मोठा वाटा हा इन्फा एज इंडियाचा असल्याचे शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून सांगितले आहे. तसेच अमेरिकेची टायगर ग्लोबल मॅनेजमेंट झोमॅटोमध्ये 735 कोटीची नवीन गुंतवणूक करणार आहे. या सर्व घडामोडीनंतर कंपनीचे सीईओ गोयल यांनी कर्मचाऱयांना ईमेलच्या आधारे आयपीओ सादर करणार असल्याचे म्हटले आहे.
सदरचा आयपीओ हा सन 2021 च्या पहिल्या सहामाहित सादर करणार असल्याचे म्हटले आहे. यात झोमॅटोला आयपीओच्या आधारे मिळणारी रक्कम ही अधिग्रहण आणि मार्केटमधील किमतीशी स्पर्धा करण्यावर खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बँकेमध्ये आता जवळपास 1.83 हजार कोटी रुपये जमा केल्याचेही सांगितले आहे.
गुंतवणुकीमधून तेजी
कंपनीला गुंतवणुकीच्या मदतीमधून कंपनीचे मूल्य 23.88 हजार कोटीने वधारुन 24.25 हजार कोटीच्या घरात पोहोचले आहे. तसेच मार्केटमधील प्रतिस्पर्धी कंपनी स्विगीने चालू वर्षात जळपास 1.14 हजार कोटी रुपयांचा फंड उभारला आहे. स्विगीचे बाजारमूल्य हे वधारुन 26.45 हजार कोटीवर असून हा झोमॅटोच्या तुलनेत थोडा जादा असल्याची माहिती आहे.