Tarun Bharat

2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अन्य पक्षांशी युती करणार नाही

प्रतिनिधी/ मडगाव

2022 विधानसभेच्या निवडणुकीत भाजप अन्य पक्षांशी युती करणार नाही. भाजप स्वतंत्रपणे लढणार असून संपूर्ण राज्यात भाजपचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी आत्तापासून तयारी सुरू केली जाणार असल्याची माहिती भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली. 2022 विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर जिंकून भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यास कार्यकर्त्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दक्षिण गोवा भाजपच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष नवनाथ नाईक, जिल्हा पंचायत सदस्य उल्हास तुयेंकर व इतरांची उपस्थिती होती.

2022च्या निवडणुकीत फक्त सालसेत मिशन मर्यादीत न ठेवता दक्षिण गोव्यातील सर्व मतदारसंघ भाजपला कशा पद्धतीने काबीज करता येतील, यासाठी रणनिती तयार केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपतर्फे आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना सामिल करून घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिण गोव्यातील जनतेची कामे पुर्ण करण्याकरिता दक्षिण गोव्यात असलेले मंत्री व आमदार एक दिवस दक्षिण गोवा कार्यालयात उपस्थित राहतील. पणजी येथे प्रत्येक कार्यकर्त्यांना आपली कामे पूर्ण करण्याकरिता त्यांना हवा तेवढा वेळ मंत्र्यांना देता येत नाही. यातून कार्यकर्त्यांचाही वेळ वाया जातो. त्यामुळे एका महिन्यानंतर दक्षिण गोव्यातील जनतेसाठी याचे नियोजन करुन दक्षिण गोव्यात असलेले मंत्री व  आमदार जनतेच्या समस्या सोडविण्यास उपस्थित राहतील असे तनावडे यांनी सांगितले.

चोडणकर यांना आपल्याच नेत्यावर विश्वास नाही

विरोधी पक्षाचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना आपल्या नेत्यांशी विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे ते स्वता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत भाजपात प्रवेश करतील असा अफवा पसरुन लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या पक्ष सुरळीतपणे चालत असून त्यामुळे आम्हाला आणखी नेत्यांची गरज नाही. तसेच विरोधी पक्षनेते कामत यांना सुद्धा आपल्यावरच विश्वास राहिलेला नाही त्यामुळे ते घरो- घरी फिरुन लोकांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न करत आहे असे तानावडे पुढे बोलताना म्हणाले.

पिंपळकट्टय़ावर घेतले दर्शन

दरम्यान, दक्षिण गोवा भाजप कार्यालयाला भेट देण्यापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मडगावच्या पिंपळकट्टय़ावर जाऊन श्री. दामबाबाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार दामू नाईक, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर तसेच इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर श्री. तानावडे यांनी फातोर्डा येथील श्री दामोदर देवस्थान (लिंग) भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.

Related Stories

अखेर वेलसांवच्या सातू सतरकरच्या घरात वीजेचा लख्ख प्रकाश

Patil_p

”निवडणुकीसाठी टॅक्सी पुरविणाऱ्या महाराष्ट्राच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा”

Abhijeet Khandekar

गौतम अदानीच्या विरोधात काँग्रेस पक्षाची निदर्शने

Amit Kulkarni

‘एनआयओ’ करणार तेलगोळय़ांचा अभ्यास

Amit Kulkarni

आमदार न फोडण्याच्या अटीवर भाजपाला पाठिंबा

Patil_p

प्रो. फुटबॉल स्पर्धेत स्पोर्टिंग क्लुब दी गोवाचा वास्कोवर विजय

Amit Kulkarni