हँग्झू (चीन) :
2022 आशियाई स्पर्धेच्या तीन शुभंकरांचे ऑनलाईन अनावरण करण्यात आले. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचे ते प्रतिनिधीत्व करतात. काँगकाँग, लियानलियान, चेन्चेन अशी या शुभंकरांची नावे आहे. आशियाई ऑलिम्पिक कौन्सिलच्या 19 व्या आशियाई स्पर्धेचे दि. 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत चीनमधील हँग्झू येथे आयोजन केले गेले आहे. चीनने या स्पर्धेचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ असणार आहे. यापूर्वी, बीजिंग 1990 व ग्वांग्झू 2010 स्पर्धा चीनने भरवल्या आहेत. 2022 आशियाई स्पर्धेसाठी आयोजन समितीकडे 4633 शुभंकरांचे डिझाईन आले होते. त्यातून चीन अकादमी ऑफ आर्टच्या झँग वेन व यांग होंगई या अधिवक्त्यांचे डिझाईनची निवड केली गेली.