कोलकता : जेएसडब्ल्यू सिमेंट 2022 पर्यंत बाजारात सुचीबद्ध होण्याच्या तयारीत आहे. कोरोना महामारी आणि आर्थिक मंदीच्या प्रभावाने कंपनी आयपीओ आणण्याची तयारी करीत आहे, अशी माहिती कंपनीच्या एका अधिकाऱयाने दिली आहे. सदरचा आयपीओ हा डिसेंबर 2022 मध्ये आणला जाण्याचे संकेत आहेत. कंपनीने 2023 पर्यंत एकूण सिमेंट उत्पादन क्षमता वाढवून 2.5 कोटी करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. ज्याकरीता जवळपास 3623 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कोरोनानंतर आता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येऊ पाहते आहे. यामुळे कंपनीची सध्यातरी लगेचच आयपीओ आणण्याची तयारी नसून डिसेंबर 2022 पर्यंत आयपीओ आणला जाणार असल्याची योजना कंपनीकडून आखली जात आहे.
Previous Articleआम्रपालीच्या मालमत्तेचा 912 कोटींना होणार लिलाव
Next Article टेस्लाच्या समभागांचा 550 टक्क्यांचा परतावा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.