सावंतवाडीत शिवसेनेच्यावतीने फटाके वाजवून करण्यात आले स्वागत
सावंतवाडी / प्रतिनिधी-
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज 21 जून पासून सर्व बाजारपेठ खुली केली आहे. त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. दुकाने उघडण्याच्या हा घेतलेल्या निर्णयाबद्दल सावंतवाडी तालुका शहर शिवसेनेच्या वतीने फटाके वाजवून अभिनंदन करण्यात आले व ग्राहक व व्यापार्यांना लाडू वाटण्यात आले. यावेळी शहर प्रमुख बाबू कुडतरकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, सतीश नार्वेकर, विशाल सावंत, राजा वाडकर, उदय अळवणी, संदेश गुरव, नितीन कारेकर, शैलेश गव्ड आदी उपस्थित होते.