गॅस स्टेशनवर घडला गुन्हा ः आरोपीचे पलायन
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडात आणखी एका टार्गेट किलिंगमध्ये एका कॅनेडियन शीख महिलेची हत्या करण्यात आली आहे. ब्रॅम्पटनची रहिवासी असलेली 21 वर्षीय पवनप्रीत कौरची ब्रिटानिया रोड क्षेत्रातील गॅस स्टेशनवर गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. गोळय़ा लागल्याने जखमी झालेल्या पवनप्रीतला रुग्णालयात हलविण्यात आले होते, परंतु तिचा जीव वाचू शकला नाही. पवनप्रीतवर गोळय़ा झाडून फरार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. कॅनडात मागील आठवडय़ातही 18 वर्षीय भारतीय वंशाच्या महकप्रीत सेठीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय वंशाच्या व्यावसायिकाच्या स्टोअरमध्ये तोडफोड आणि लूट करण्यात आली होती.