ऑनलाईन टीम/तरुण भारत
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या (jacqueline fernandez) अडचणीत वाढ वाढल्या आहेत. आयकर विभागानं ( Income Tax Department) २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी जॅकलिनला आरोपी बनवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयच्या मते, जॅकलीन फर्नांडीसला आधीपासूनच माहित होतं की, सुकेश एक खंडणीवसुली करणारा अपराधी आहे. तसेच तिला हे देखील माहित होतं की, सुकेश लोकांकडून जबरदस्ती खंडणी वसुली करतो. यामुळेच सक्तवसुली संचालनालयाने (ED) आता जॅकलीनवर आरोपपत्र दाखल केलं आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव २०० कोटींच्या मनी लँड्रिंग प्रकरणात चांगलेच चर्चेत आहे. ठग सुकेश चंद्रशेखर यांच्याशी तिचे नाव जोडलं गेले होते. यामुळे जॅकलिन ही आयकर विभागाच्या रडारवर होती. या काळात जॅकलिनची कसून चौकशी देखील झाली होती. मात्र स्वतःवर लावण्यात आलेल्या आरोपांचं जॅकलिननं खंडन केलं होतं. तर दुसरीकडे सुकेश हा गुन्हेगार आणि खंडणीखोर असल्याची माहिती जॅकलिनला यापूर्वीच होती, असा दावा ईडीने केला आहे.
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जॅकलिन फर्नांडिसला ठग सुकेश चंद्रशेखरनं ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. एवढंच नाही तर त्यानं तिच्या कुटुंबीयांनाही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. हा सर्व पैसा सुकेशनं लोकांची फसवणूक करून आणि गुन्हेगारीतून कमावला होता. दिल्लीमध्ये तुरुंगात असताना त्यानं एका महिलेचे २०० कोटी रुपये फसवणूक करुन लांबवले होते. आयकर विभागनं दिलेल्या माहितीप्रमाणे जॅकलिनच्या विरोधातील ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणात तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरवर २१५ कोटी रूपयांची जबरदस्ती वसुली केल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तपासणी केल्यावर समजलं की, सुकेशने जॅकलीनला माहागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या. ज्यानंतर सक्तवसुली संचालनालयने (ईडी) कारवाई करत ७ कोटींची संपत्ती देखील जप्त केली. तपासणी दरम्यान या संपूर्ण प्रकरणांचा खुलासा झाला. एका सहकारीने सुकेशची ओळख जॅकलीन सोबत करून दिली होती. तसेच सुकेशच्या सहकारीच्या मदतीने जॅकलीनला हे महागड्या भेट वस्तू पाठवायचा. इतकंच नव्हे तर या दोघांचे काही फोटो देखील समोर आले होते. ज्यातून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं समोर आलं होतं