नवी दिल्ली
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दुसऱया तिमाहीत 2172 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला असल्याचे समजते. दुसऱया तिमाहीमध्ये या अगोदरच्या आर्थिक वर्षात कंपनीने 1923 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. बाजारात असणारा दबाव तोटा होण्यासाठी कारणीभूत ठरला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या एकूण महसुलामध्ये 30 टक्के वाढ झाली आहे. या तुलनेमध्ये कंपनीच्या एकूण खर्चामध्ये 36 टक्क्मयांनी वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा परिणामही कंपनीला तोटय़ात आणणारा ठरला असल्याचे बोलले जाते.