Tarun Bharat

22 मुलांच्या आईची भन्नाट ट्रिक

दररोज सकाळी जागे करण्याचा प्रेमळ प्रकार

स्वतःच्या मुलाला दररोज सकाळी जागवून वेळेत शाळेत पाठविणे त्याच्या आईसाठी अत्यंत मोठे टास्क असते. मग 22 मुलांच्या आईचे काय होत असेल याचा विचार करा. ब्रिटनमध्ये राहणारी 22 अपत्यांची आई सू रेडफोर्ड दररोज सकाळी सहजपणे स्वतःच्या सर्व मुलांना जागविण्यासह शाळेत जाणाऱया 10 मुलांना वेळेत शाळेत पाठविते. याकरता त्या एक मजेदार ट्रिक वापरतात आणि काही सेकंदात सर्व मुले बेडमधून बाहेर पडतात.

टॅलेंटेड आई

ब्रिटनमधील सर्वात मोठे कुटुंब सांभाळणाऱया या आईची क्षमता आणि योग्यता कुणालाही थक्क करणारी आहे. सू रेडफोर्ड 22 मुलांच्या आई असून स्वतःच्या पतीसोबत मिळून एवढय़ा सर्व मुलांचे उत्तम पालनपोषण करत आहेत. यात सर्व मुलांसाठी स्वयंपाक तयार करणे आणि त्यांचे कपडे धुणे यासारखी कामे सामील आहेत.

रोज वेळी मुलांना जागविते

सू रेडफोर्ड यांच्यासाठी एक अत्यंत मोठे काम स्वतःच्या 22 मुलांना सकाळच्या वेळी झोपेतून उठविणे आहे. या कामात अधिक वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी एक ट्रिक शोधून काढली आहेत. सू रेडफोर्ड यांची 10 मुले शाळेत जातात, यातील 4 मुले तर प्राथमिक शाळेतील आहेत.

सर्वात छोटय़ा मुलाची साथ

आपण कशाप्रकारे दररोज सर्व मुलांना झोपेतून उठविते हे सू यांनी इन्स्टाग्राम पेजवर एक क्लिप शेअर करत सांगितले आहे. कुणालाही जागं करण्यासाठी एक हैदीची गरज असते असे सू यांनी म्हटले आहे. या क्लिपमध्ये 18 महिन्यांचा हैदी स्वतःच्या भावाला जागं करताना दिसून येतो. हैदी ओरडू लागतो आणि स्वतःच्या मोठय़ा भावाचे ब्लँकेट खेचतो. त्यानंतर हैदी आपला भाऊ अंथरूणातून बाहेर पडेपर्यंत त्याचा मुका घेत राहतो. या ट्रिकद्वारे आणि हैदीच्या मदतीने सू स्वतःच्या सर्व मुलांना झोपेतून जागे करतात. त्यानंतर ही सर्व मुले काही वेळातच शाळेसाठी तयार झाल्याचे दिसून येते.

नेटीझन्सची पसंती

मुलांना जागविण्याची सू यांची ही ट्रिक नेटीझन्सना अत्यंत पसंत पडली आहे. सू आणि त्यांचे पती नोएल रेडफोर्ड यांना 22 अपत्य असून ती 32 वर्षांपासून एक वर्षांपर्यंत वयाची आहेत.

Related Stories

वाढत्या कर्जामुळे पाकिस्तान संकटात

Patil_p

तैवान : आदर्श उदाहरण

Patil_p

मोल्नुपिराविर टॅबलेटला ब्रिटन सरकारची मंजुरी

Amit Kulkarni

इंग्रजीची खिल्ली…लोकांचा संताप

Patil_p

रशियाच्या तेलसम्राटाचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

…म्हणे झांगनान हा चीनचाच भाग!

Patil_p