बंगालमध्ये अनोख्या मेळय़ाचे आयोजन
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेचा मेळा पूर्ण देशात चर्चित आहे, परंतु बंगालमध्ये माशांचाही मेळा लागतो हे माहित आहे का? बंगालच्या दुर्गापूरमध्ये मछली मेळा आयोजित होतो, जेथे सर्वप्रकारचे मासे खायला मिळतात. बंगालचे लोक मासेभात खाणे अत्यंत पसंत करतात.
मासेभातासह बंगालींसाठी दुर्गापूरमध्ये फॅन्सी मछली मेळा आयोजित करण्यात आला असून याला ‘मछली चावल में बंगाली’ असे नाव देण्यात आले आहे. भात, डाळी, भाज्या, माशांचे सूप किंवा तळलेल्या माशांचे लोचणे हे बंगालच्या लोकांना अत्यंत पसंत असते.
शहराच्या मधोमध दुर्गापूरमध्ये यंदा फॅन्सी मछली मेळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळय़ात रुई, कतला, वेटकी, प्रॉमप्रेट, टंगरा समवेत 22 प्रकारच्या माशांसह त्यांना खाद्यपदार्थात रुपांतरित करणारे स्टॉल देखील आहेत. यात लोकांना स्वतःचे पैसे खर्च करावे लागत नाही आणि या मोफत मेळय़ाचे आयोजन दुर्गापूर एलो वेलफेयर सोसायटीकडून केले जाते. उद्योजकांकडून कोरोना काळामुळे लोकांच्या मनातील नकारात्मकता दूर करणे आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी या मेळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या शहरातील जवळपास सर्वच लोक यात सामील होतात आणि मनसोक्त मासे आणि भाताचा आनंद घेतात.