प्रतिनिधी/ रत्नागिरी :
निवडक आंब्याच्या पेटय़ा विक्रीसाठी भरल्यानंतर उर्वरित आंबा पॅनिंगसाठी घातला जात़ो मात्र यंदा 22 ते 23 प्रती किलो दराने आंबा खरेदी चालू आह़े हा दर कमी असल्याचे बागायतदारांनी सांगितल़े हापूसचा दर घरल्यामुळे पॅनिंगसाठी हापूस पाठवण्यात बागायतदरांचा कल असल्याचे दिसून येत आह़े
लांबलेला पाऊस व हवामानातील बदलांमुळे यावर्षी आंबा उत्पादन नियोजित हंगामापेक्षा उशीराच सुरु झाल़े मार्चपासून टप्प्याटप्प्याने आंबा बाजारात दाखल झाल़ा मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदीमुळे हापूसची वितरण साखळी काहीशी कोलमडल्याचे चित्र होत़े परंतु हापूसच्या देशांतर्गत विक्रीसह परदेशामध्ये निर्यातीला चालना देऊन ही विक्री सुरळीत करण्यात यश आले होत़े आता हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आह़े तसेच निवडक हापूसची विक्री केल्यानंतर उर्वरित आंबा हा पॅनिंगसाठी विकला जात़ो यंदा दर 22 ते 23 प्रतिकिलो असून मागच्या हंगामापेक्षा कमी असल्याचे बागायतदारांनी सांगितल़े
शहरासह ग्रामीण भागामध्ये हा पॅनिंगचा आंबा खरेदीसाठी व्यापारी बागायतदारांपर्यत जातात़ मात्र कोरोनामुळे काही निवडक व्यापारीच हा आंबा खरेदीसाठी येत असल्याचे दिसून येत आह़े तसेच ग्रामीण भागासह शहरामध्ये पॅनिंगचा आंबा खरेदीचे स्टॉल व्यापारी उभे करतात़ मात्र यंदा ही संख्या अगदी नगण्य असल्याचे चित्र आह़े तसेच मिळणारा दरही अल्प असल्यामुळे पॅनिंगची होणारी उलाढाल यंदा कमी होण्याची शक्यता आह़े त्यातच पुन्हा एकदा बाजार समित्यांचे काम ठप्प झाले आह़े परिणामी थेट ग्राहक अथवा पॅनिंगसाठी हापूस पाठवण्याशिवाय पर्याय नसल्याचे बागायतदारांनी सांगितले. तसेच हापूसचा दरही कमी आला आह़े त्यामुळे बहुतांश बागायतदारांनी पॅनिंगसाठी आंबा पाठवण्यास सुरुवात केली आह़े