Tarun Bharat

देसूर गावातील रस्त्यांसाठी 22 लाखाचा निधी

Advertisements

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील देसूर गावामध्ये रस्त्यांसाठी 22 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हा निधी मंजूर केला असून त्यांच्या हस्ते रस्त्याच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी त्या म्हणाल्या, गेल्या चार वर्षांत या मतदार संघातील विविध भागांमध्ये विकासकामे करण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. अनेक मोठय़ा योजना राबवून सर्वपरीने विकास करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लहान मोठय़ा समस्या असल्या तरी त्याची मी दखल घेत आहे. आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधांना प्राधान्य देण्याबरोबरच मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि समुदाय भवनाच्या निर्माणासाठी मी अनुदान मंजूर केले आहे. यापुढेही करत राहिन, असे सांगितले. यावेळी युवराज कदम, संतोष मरगाळे, गणपत पाटील, सतीश चव्हाण, व्यंकट पाटील, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

‘स्पर्श’ कुष्टरोग जागृती अभियानाला चालना

Amit Kulkarni

रविवारी व्यवहार सुरू परंतु गर्दी तुरळक

Patil_p

जोतिबाचा चैत्रोत्सव साध्या पद्धतीने

Amit Kulkarni

अखेर समांतर फंड वाटप करण्यास मंजुरी

Patil_p

सरीवर सरी… चिंता दाटे उरी!

Omkar B

इटनाळमध्ये जावयाकडून सासऱयाचा खून

Patil_p
error: Content is protected !!