Tarun Bharat

‘त्या’ 22 शाळांना शनिवारीही सुट्टी

प्रतिनिधी / बेळगाव :
रेसकोर्स परिसरात वावरत असलेल्या बिबट्याचा अद्याप शोध न लागू शकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शनिवार दि. 13 रोजी रेसकोर्स परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील एकूण 22 शाळांना सुट्टी देण्यात आल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांनी दिली आहे.

बेळगाव शहरातील सरकारी प्राथमिक शाळा हनुमाननगर, सरकारी प्राथमिक शाळा, कुवेंपू नगर, सरकारी प्राथमिक शाळा सहय़ाद्रीनगर, सरकारी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर, केएलई इंटरनॅशनल स्कूल, कुवेम्पू नगर, वनिता इंग्लिश मिडियम स्कूल, केंद्रीय विद्यालय-2, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी स्कूल क्लब रोड, सेंट झेवियर्स स्कूल, जीएलपीएस उर्दू स्कूल याचबरोबर ग्रामीण भागातील सरकारी मराठी प्राथमिक शाळा हिंडलगा, कन्नड प्राथमिक शाळा हिंडलगा, उर्दू प्राथमिक शाळा हिंडलगा, हिंडलगा हायस्कूल, ट्विन्स लँड स्कूल हिंडलगा, सेंट पिटर स्कूल हिंडलगा, कन्नड प्राथमिक शाळा विजयनगर, मराठी प्राथमिक शाळा विजयनगर, संत मीरा स्कूल लक्ष्मीनगर या शाळांना सुटी देण्यात आली आहे.

Related Stories

खानापुरात प्रो कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Omkar B

रंगोली संगीत परिवारच्या फेसबुक पेजवर अकॅडमी ऑफ म्युझिकच्या शिष्य-गुरुंचा कार्यक्रम

tarunbharat

खानापूर नगराध्यक्ष निवड बिनविरोध होणार

Patil_p

शहरातील मिरवणूक मार्गांचा होणार विकास

Patil_p

कोरोनावरील लस आज बेळगावला येणार

Patil_p

एपीएमसी बाजारात कांदा दरात वाढ

Omkar B