गंगटोक/
सिक्कीमच्या गंगटोक जिल्ह्dयात 22 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित युवती 25 नोव्हेंबर रोजी रात्री गंगटोकच्या एका स्थानिक पबमधील पार्टीतून घरी परतत असताना हा प्रकार घडला आहे. युवती एका टॅक्सीतून घरी जाण्यासाठी निघाली होती. परंतु तिला घरी सोडण्याऐवजी चालकाने गंगटोकपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावरील रानीपूल भागात नेत स्वत:च्या दोन मित्रांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केला होता, अशी माहिती गंगटोकचे पोलीस अधीक्षक तेनजिंग लोडेन लेप्चा यांनी दिली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.