Tarun Bharat

पुणे- पंढरपूर रोडवर अपघातात २२ वर्षीय युवती ठार

Advertisements

सातारा / प्रतिनिधी

फलटण शहरातील पुणे- पंढरपुर रोड लगत असलेल्या रानाडे पेट्रोल पंप शेजारी असलेल्या गॅलेक्सी हॉटेल समोर एका डंपरचा व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 वर्षीय युवती जागीच ठार झाली. काजल धनंजय कुतवळ (रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे ठार झालेल्या युवतीचे नांव आहे‌.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज मंगळवारी दि. 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पुणे- फलटण रोडवर अपघात झाला. पुणे- पंढरपूर रोडवर डंपर क्रमांक (एम. एच.12 एम. व्ही. 4570) जात असताना पाठीमागून येऊन जोरदार धडक दिली.

अपघातातील जखमी झालेली काजल हिला फलटण शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हिस मृत घोषीत केले.

Related Stories

हद्दवाढीतील विकास कामे निधी अभावी रखडली

Patil_p

घरगुती गणपतीच्या मूर्ती खरेदीला थंड प्रतिसाद

Patil_p

सातारा : भारतीय हवामान खात्याने दिला वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा

Abhijeet Shinde

लग्नाचे अमिष दाखवणाऱया सातारच्या बंटी-बबली इस्लापूर पोलीसांकडून अटक

Patil_p

सातारा तालुक्यात सहा मृत

Patil_p

तीन दिवसात 4204 जणांची कोरोनावर मात

Patil_p
error: Content is protected !!