वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अर्थात ईपीएफओने 23 कोटी खातेदारकांना आर्थिक वर्ष 2020-21 मधील व्याजाची रक्कम नुकतीच त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ईपीएफओने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली असल्याचे समजते. ईपीएफओ खातेधारकांना 8.5 टक्के दराने व्याज जमा केले आहे. सदरची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर नमूद केलेल्या आर्थिक वर्षाकरिता जमा करण्यात आली आहे. खात्यातील रक्कम जमा झालेली पाहण्यासाठी खातेदारांना 011 -22 901406 या नंबर वर मिस कॉल देता येणार आहे. त्यानंतर ईपीएफओ संस्थेचा आपल्याला खात्याच्या शिल्लक रक्कमेचा मेसेज येईल. संस्थेकडे इच्छुक खातेदारांचे पात्र मोबाईल नंबर मात्र नोंदणी केलेला असणे आवश्यक आहे.