Tarun Bharat

239 तास अन् 13 हजार किमीचे उड्डाण

अलास्का ते ऑस्ट्रेलियापर्यंत पक्ष्याचा नॉनस्टॉप प्रवास

वन्यप्राणी स्वतःच्या जोडीदाराच्या शोधात किंवा भक्ष्याकरता हजारो किलोमीटरचा प्रवास करत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. पण आता एक पक्ष्याची कहाणी समोर आली आहे. या पक्ष्याने 239 तासांमध्ये 13 हजरा किलोमीटरचे अंतर कापले आहे. हा पूर्ण प्रवास या पक्ष्याने कुठलाही बेक न घेता केला आहे. हा पक्षी कुठेच थांबला नाही, केवळ आकाशात सातत्याने उडत राहिला.

आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी पोस्ट ट्विटवर शेअर करत माहिती दिली आहे. एका बार-टेल्ड गॉडविटने कुठल्याही विश्रांतीशिवाय 13 हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. हा प्रवास अलास्कापासून ऑस्ट्रेलियापर्यंतचा होता. या पक्ष्याने विक्रम केला आहे. आतापर्यंत इतक्या अंतरापर्यंत कुठलाच पक्षी सलगपणे उडलेला नाही. तर या पक्ष्याची छायाचित्रे जेफ व्हाइट आणि ऍड्रियन रिगन यांनी काढली आहेत.

या पक्ष्याची कामगिरी ऐकून प्रत्येक जण थक्क झाला आहे. या पक्ष्याच्या प्रवासाकरता ट्रकिंग उपकरण त्याच्यावर बसविण्यात आले होते. या पक्ष्याने केलेला प्रवास संशोधकांची अनेक गृहितके मोडित काढणारा ठरणार आहे.

Related Stories

रमजान स्पेशल : जगातील सर्वात सुंदर अन् ऐतिहासिक मशिदी

Amit Kulkarni

चीन : 11 नवे रुग्ण

Patil_p

इम्रान खान यांना पुन्हा न्यायालयाचा दिलासा

Patil_p

कोरोनापुढे हतबल झालेल्या अमेरिकेने मागितली भारताकडे मदत

prashant_c

अमेरिकेत 20 लाखांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

अमेरिकेच्या वायुतळावर चिनी बलूनच्या घिरटय़ा

Patil_p