Tarun Bharat

24 जानेवारी रोजी वरुण धवन विवाहाच्या बेडीत

2020 या वर्षात अनेक कलाकारांनी स्वतःचा जोडीदार निवडून त्याच्याशी विवाह केला आहे. परंतु आता लवकरच 2021 मधील पहिला ग्रँड सेलिब्रिटी विवाह हाणार आहे. वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाहसोहळा आता चर्चेत आला आहे. 24 जानेवारी रोजी अलिबागमध्ये होणाऱया या सोहळय़ाचे ठिकाण आणि अतिथींची यादीही समोर आली आहे. अलिबागच्या द मेंशन हाउसमध्ये वरुण-नताशा विवाहाच्या बंधनात अडकतील. या विवाहाचे विधी गुरुवारपासूनच सुरू झाले आहेत.

धवन तसेच दलाल कुटुंब अलिबागमध्ये पोहोचले आहे. नताशाच्या घरी गुरुवारी चुन्नी सोहळय़ाच्या विधी करण्यात आल्या. पंजाबी पद्धतीच्या विवाहात या विधीचे विशेष महत्त्व आहे. वरुण आणि नताशा यांचा विवाह यापूर्वी व्हिएतनाममध्ये होणार होता. परंतु महामारीमुळे तो निर्णय टाळण्यात आला होता.

Advertisements

अलिबागच्या एका गावात द मेंशन हाउस नावाचे एक आलिशान रिजॉर्ट आहे. हे रिजॉर्ट विशेषकरून विवाहासारख्या सोहळय़ांसाठीच प्रख्यात आहे. समुद्र किनाऱयावरील हे रिजॉर्ट अत्यंत प्रेक्षणीय आहे. या विवाह सोहळय़ात मित्रपरिवार आणि कुटुंब मिळून केवळ 50 जणच सामील होणार असल्याचे समजते. नताशा फॅशन डिझाइनर असून स्वतःचा तयार केलेला पोशाख ती विवाहसोहळय़ात परिधान करणार आहे. वरुण आणि नताशा बालपणापासून परस्परांना ओळखतात.

Related Stories

धोतर नेसलेल्या बटुकांनी हाती घेतली बॅट

Amit Kulkarni

घटस्फोट घोषणेनंतर २४ तासाताच आमिर खान आणि किरण राव आले एकत्र …कसं ते वाचा सविस्तर

Abhijeet Shinde

अजय देवगनच्या मावळय़ाने सांगितला नैराश्यावर मात करण्याचा मार्ग

Patil_p

टिस्का चोप्रा मदतीसाठी सरसावली

Patil_p

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झळकणार वेल डन बेबी

Patil_p

‘कभी ईद कभी दिवाली’मध्ये पलक तिवारी

Patil_p
error: Content is protected !!