Tarun Bharat

24 तासात 9 दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

काश्मीर खोऱ्यात मागील 24 तासांत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. दक्षिण काश्मीरमध्ये बुधवारी रात्री उशिरा कुलगाम, अनंतनाग आणि श्रीनगर येथे झालेल्या तीन वेगवेगळय़ा चकमकीत जेव्हन येथे (श्रीनगरच्या बाहेरील भागात) पोलीस बसवर हल्ला करणाऱ्या जैशच्या तीन दहशतवाद्यांसह एकूण नऊ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून दोन एम 4, चार एके 47 रायफल्स आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

श्रीनगर जिल्ह्यात गोमंतर मोहल्ला येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी मध्यरात्री सुरक्षा दलांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयास्पद घरात हे पथक प्रयत्न करत असतानाच आतून अचानक गोळीबार सुरू झाला. यात चार जवान जखमी झाले. यामध्ये तीन पोलीस आणि सीआरपीएफच्या एका जवानाचा समावेश आहे. दरम्यान, सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनागमधील नौगम येथे सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला. 13 डिसेंबर रोजी जेव्हन येथे पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी सामील होते. तत्पूर्वी, बुधवारी रात्री नौगाम आणि कुलगाम येथे पाकिस्तानी जैशच्या नेत्यासह तीन दहशतवादी ठार झाले होते. एकाच रात्री दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Related Stories

रोस्टर हक्क चळवळीचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

datta jadhav

मोळाचाओढा रस्त्यावरील अरुंद पुल देतोय अपघातांना निमंत्रण

Patil_p

Satara Accident : कुरकुरे आणि बिंगो जळून खाक; निष्काळजीने वाहन चालवल्याने चालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

सातारा : वाई बाजारपेठ एक महिन्याने उघडली

Abhijeet Shinde

लम्पी स्किनने सातारा जिल्ह्य़ात ५ जनावरे दगावली

Abhijeet Shinde

जिल्हा बँकेत आजी-माजी मंत्र्यांचा पराभव

datta jadhav
error: Content is protected !!