बेळगाव पोलिसांची गांजाविरुद्ध मोहीम सुरू, बेळगाव पोलिसांची गांजाविरुद्ध मोहीम सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकात अमली पदार्थांची विक्री करणाऱया माफीयांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये अनेक चित्रपट अभिनेत्री, अभिनेते, राजकीय नेत्यांची मुले अडकली आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनीही कारवाई तीव्र केली असून गेल्या 24 तासांमध्ये दीड क्विंटल गांजासाठा जप्त करण्यात आला आहे.
अथणी, सौंदत्ती, कुडची, चिकोडी परिसरात ही कारवाई केली असून जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी शुक्रवारी रात्री अथणी तालुक्मयातील हनमापूर क्रॉसजवळ दोन किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी जत तालुक्मयातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
सागर भरमा कट्टीकर, गुरुलिंगाप्पा व्हळय़ाप्पा डोळ्ळी (दोघेही रा. जीरगीहाळ, ता. जत) अशी त्यांची नावे आहेत. या दोघा जणांवर अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. जत तालुक्मयातून हे दोघे गांजा विक्रीसाठी आले असता त्यांना अटक करण्यात आली आहे.
कुडची (ता. रायबाग) पोलिसांनी सुटट्टी येथे 120 किलो कच्चा गांजा जप्त केला आहे. या संबंधी लक्काप्पा सत्याप्पा खोत, लक्ष्मण लक्काप्पा खोत या दोघा जणांना अटक करण्यात आली असून शेतजमिनीत पिकविलेला गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. सौंदत्ती पोलिसांनी महांतेश रामण्णा कलुती (रा. बटकुर्की) याला अटक करुन त्याच्याकडून 872 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 20(ए), 20(बी) कलमान्वये अथणी, कुडची, सौंदत्ती पोलीस स्थानकात या तिन्ही प्रकरणांची नोंद झाली आहे. जिल्हय़ातील अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
दरम्यान चिकोडी पोलिसांनी बेळगली (ता. चिकोडी) येथे उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱया शिवाप्पा सत्याप्पा शिरगांवी या वृद्ध शेतकऱयाला अटक करुन त्याच्या जवळून 17 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. गेल्या 24 तासांत एकूण सहा जणांना अटक करुन दीड क्विंटल इतका गांजा जप्त करण्यात आला आहे.