प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1618 झाली आहे. यामध्ये सिव्हिल रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ञ व त्यांच्या कुटुबीयांचा समावेश आहे. दरम्यान, रत्नागिरीतील एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 53 झाली आहे.
रविवारी रात्री पॉझीटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी 25, कामथे 8, दापोली 11, कळबणी 7, गुहागर 8, रायपाटणमधील तिघांचा समावेश आहे.
97 जण कोरोनामुक्त
97 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1084 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 1, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 45, आणि 38 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण मधील आहेत.
स्त्रीरोगतज्ञ, कुटुंबीयांना लागण
जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रसुती विभागात कार्यरत असलेलया स्त्राrरोग तज्ञांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांचा पती, एक वर्षाचा मुलगा व सासूचाही रिपोर्ट रविवारी रात्री पॉझीटीव्ह आला आहे.
कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱया डॉक्टर, परिचारिका यांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाता बालरोग व भूलतज्ञ पॉझीटीव्ह आढळल्यानंतर आता स्त्राr रोग तज्ञांनाच कोरोनाची लागण झाल्याने सिव्हीलसमोर नव्याने समस्या उभी राहिली आहे. महिनाभरापूर्वी प्रसुती विभागात 5 माता, नवजात बालके, परिचारिका पॉझिटीव्ह आल्या होत्या. आता प्रसुती विभागात गेल्या वर्षभरापासुन उत्तम कामगिरी करणाऱया स्त्राrरोग तज्ञा पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 16 हजार 436 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 16 हजार 35 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1618 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 14 हजार 405 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 401 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
खेडमधील दोघांचा जिल्हय़ाबाहेर मृत्यू
कोल्हापूर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱया तालुक्यातील आवाशी-मधलीवाडी येथील 64 वर्षीय वृद्धेचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. यापाठोपाठच शहरातील महाडनाका येथील 62वर्षीय वृद्धेचाही 25 जुलै रोजी कुर्ला-मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघींच्या मृत्यूमुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 7वर पोहचली आहे.
आवाशी-मधलीवाडी येथील 64 वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरडा कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यानंतर तिला रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने तिला कोल्हापूर येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे तिने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रविवारी रात्री प्राप्त अहवालानुसार 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. घाणेखुंट, आवाशी येथील प्रत्येकी दोन रूग्णांसह लोटेतील 3 रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील व्यक्तींचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत 327 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून 224 जण कोरोनामुक्त झाले आहेत.