ऑनलाईन टीम / मुंबई :
मानखुर्दमध्ये लागलेली भीषण आग 24 तास उलटून गेले तरी अजूनही धुमसत आहे. शुक्रवारी मंडला परिसरात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. धुराचे मोठे लोळ हवेत पसरताना दिसत होते. आगीने अत्यंत रौद्र रुप धारण केले होते. मात्र, आता 24 तास उलटून गेले तरी अद्याप या आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिथे आग लागलीय त्या भागाला कुर्ला स्क्रॅप म्हटले जाते. ही आग वाढत चालली आहे. ही आग लेवल 3 ची आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहावी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ही आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीने प्रयत्न करत आहेत. आग विझवण्याचे काम करीत असताना केमिकल अंगावर उडाल्याने एक अग्नीशमन दलाचा एक जवान किरकोळ जखमी झाला आहे.
या परिसरात आजूबाजूला प्लॅस्टिकचेही गोदाम आहेत. आग वाढतच चालली आहे. त्यामुळे परिसरातील प्लॅस्टिकचे गोदामांनाही आग लागण्याची भीती होती.