वार्ताहर/ कुडाळ
सरताळे (ता. जावळी) हद्दीतून एक लाख 64 हजार किमतीच्या 2 हॉल्टच्या एकूण चोवीस बॅटऱया अज्ञात चोरटय़ांनी चोरली असल्याची तक्रार कुडाळ पोलिस स्थानकामध्ये दाखल झाली आहे. यासंदर्भात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सरताळे हद्दीतील म्हसवे फाटय़ाजवळ संत जनाबाई लक्ष्मण नवले रा. सरताळे यांच्या मालकीच्या गट नंबर मधून दोन बॉल अशा एकूण 24 बॅटऱया अंदाजे किंमत एक लाख 64 हजार रुपये किंमत अशा अज्ञात चोरटय़ाने चोरून नेल्या आहेत. यासंदर्भात अधिक तपास पोलीस हवालदार ओवाळ करत आहेत.