कंगना रनौनाच्या चाहत्यांसाठी खूषखबर
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा ‘थलाइवी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. हिंदीतील प्रेक्षकांना घरबसल्या थलाइवी चित्रपट पहायला मिळार आहे. 10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या थलाइवीचे हिंदी व्हर्जन 24 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर झळकणार असल्याचे समजते. पण याचा तमिळ आणि तेलगू व्हर्जन ओटीटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 4 आठवडय़ांनी पहायला मिळार आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने चित्रपटगृहे सुरू करावीत असे आवाहन कंगनाने राज्य सरकारला केले आहे. चित्रपटगृह बंद राहिल्याने चित्रपटसृष्टीचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शिन करण्यामधील कालावधी कोरोना संकटापूर्वी 8 आठवडय़ांचा असायचा. पण कोरोना काळात हा कालावधी 4 आठवडे करण्यात आला आहे. तर थलाइवी चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनबाबत हा कालावधी 2 आठवडय़ांचा करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
थलाइवी हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललिता यांच्या जीवनावर बेतलेला आहे. कंगनाने यात जयललिता यांची व्यक्तिरेखा साकारल्याने तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.